मंडलाधिकारी यांच्या चौकशी चे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

मंडलाधिकारी यांच्या चौकशी चे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

प्रतिनिधी—सोलापूर—माळशिरस तालुक्यातील नातेपुते गावचे मंडलाधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी व त्यांच्या कामाची दप्तर तपासणी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांच्याकडे केली होती.

या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकारी श्री मिलिंद शंभरकर यांच्याकडील पत्र क्रमांक2020/मह/आस्था-03/प्र.क्र./101/आर आर/629/ 2020/दिनांक 6/7/2020 या पत्राच्या संदर्भाने उपविभागीय अधिकारी अकलूज यांना चौकशी करण्यासाठी पत्रव्यवहार केल्यानंतर उपविभागीय अधिकारी अकलूज यांनी माळशिरस तालुक्याचे तहसीलदार श्री निंबाळकर यांना प्रस्तुत अर्जात नमूद मुद्याबाबत वस्तुस्थिती,प्रस्तुत प्रकरणी शासन नियमानुसार अवलंबायची विहित कार्यपद्धती/तरतुदी त्यानुसार प्रत्येक्ष करण्यात आलेली कार्यवाही याबाबत विहित कार्यपद्धती/तरतुदी नुसार कार्यवाही करून आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रयासह तात्काळ इकडील कार्यालयास सादर करावा असा आदेश दिला आहे.त्यामुळे माझया मागणीला यश मिळाले असल्याचे सांगून जोपर्यंत संबंधित मंडलाधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom