राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी अॅड गणेश पाटील.
प्रतिनिधी—गुरसाळे–राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील पद नव्याने निवड करण्यासाठी अनेकांनी मुलाखती दिल्या होत्या त्यामध्ये अनेकजण इच्छुक होते मात्र पंढरपूर तालुक्यातील दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले राजूबापू पाटील यांचे पुत्र अॅड गणेश पाटील यांची सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात निवडीचे पत्र देऊन केली आहे.
राजूबापू पाटील हे पवार घराण्याशी व राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ होते व शरद पवार यांचे विश्वासु म्हणून त्यांची ओळख संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात होती,त्यांचे पुत्र अॅड गणेश पाटील हे सुद्धा वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकून सर्वसामान्य जनतेसाठी व सोलापूर जिल्ह्यातील युवक वर्गाला पक्षाला उभारी देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांना वाटल्याने त्यांना ही जबाबदारी दिली आहे,गणेश पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने त्यांना कृषिराज शुगर यशपुष्प नगर भोसे या गणेश (दादा)पाटील यांच्या कारखान्याच्या शेती विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून निवडीच्या व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
