बहुजन ब्रिगेड संघटनेच्या आंदोलनाला मिळाले यश
पूरग्रस्तांना प्रशासनाने केली मदत
पिलीव पुढारी वूत्तसेवा
माळशिरस तालुक्यातील पिलीवमळोली,कोळेगाव,फळवणी, तोंडले-बोडले या गावांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे ज्या लोकांची घरे वाहून गेली आहेत अशा सर्व पूरग्रस्तांना तात्काळ शासकीय मदत मिळावी अशा पूरग्रस्तांना कोणतीच अट लावू नये व लावण्यात आलेल्या अटी त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने बहुजन ब्रिगेडचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली व माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.सदर आंदोलनाची दखल घेऊन उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे पत्र पाठवून संबंधित पूरग्रस्तांना तात्काळ मदत करण्यात यावी असा दिनांक नऊ अक्टोबरला लेखी आदेश देण्यात आला होता.
बहुजन ब्रिगेड संघटनेने केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन माळशिरस तहसील कार्यालयामार्फत माळशिरस तालुक्यातील बचेरी येथील आठ पूरग्रस्तांना 18400,बोडले येथील 92 पूरग्रस्तांना 211600,दसुर येथील 3 पूरग्रस्तांना 6900,फळवणी येथील 73 पूरग्रस्तांना 167900,इस्लामपूर येथील 3 पूरग्रस्तांना 6900,कदम वाडी येथील 2 पूरग्रस्तांना 4600,काळमवाडी येथील 7 पूरग्रस्तांना 16100,खळवे येथील 19 पूरग्रस्तांना 43700,कोळेगाव येथील 152 पूरग्रस्तांना 349600,कुसमोड येथील 10 पूरग्रस्तांना 23000,मळोली येथील 167 पूरग्रस्तांना 384100,पिलीव येथील 157 पूरग्रस्तांना 361100,शिंगोरणी येथील 27 पूरग्रस्तांना 62100,सुळेवाडी 21 पूरग्रस्तांना 48300,तांदुळवाडी येथील 2 पूरग्रस्तांना 4600,तोंडले येथील 67 पूरग्रस्तांना 154100,वेळापूर येथील 3 पूरग्रस्तांना 6900,येळीव येथील 3 पूरग्रस्तांना 6900,झंझेवाडी येथील 1 पूरग्रस्तांना 2300,झिंजेवस्ती येथील 15 पूरग्रस्तांना 34500 एवढी मदत करण्यात आली असून तसेच राहिलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे अनुदान मागणी करण्यात आली आहे एकूण मागणी पैकी उपलब्ध असलेले अनुदान पूरग्रस्तांना वाटप केल्याचे माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांनी बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे.तसेच माळशिरस तालुक्यातील 24 गावातील पूरग्रस्तांना तात्काळ मदत केल्याने आमच्या संघटनेच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे बहुजन ब्रिगेड संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील यांनी सांगितले.यावेळी माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,तालुका सरचिटणीस अभयराजे भोसले,शहराध्यक्ष आनंद मिसाळ,युवा अध्यक्ष उदय कांबळे,उपाध्यक्ष बंडू कांबळे,उपस्थित होते.
