अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने भरपाई द्या : अॅड:गणेश (दादा)पाटील 

अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने भरपाई द्या : अॅड:गणेश (दादा)पाटील

प्रतिनिधी–पंढरपूर–भीमा नदीला महापूर आल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथील गावामध्ये शेतामध्ये नदीकाठच्या वाडीवस्ती वर पाणीआल्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यांची सोय करण्यात आली आहे.तसेच शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यात गेली असून घरामध्ये पाणी शिरले आहे.शेती घरांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून सध्या कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आलेला असून आता आसमानी संकटामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापलेला आहे.त्यामुळे त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. सदर ठिकाणी गणेश पाटील यांनी गुरुवारी प्रत्यक्ष भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी करुन माहिती घेतली.शेतीच्या व घराची झालेली पडझड दगावलेली अथवा पुरामध्ये वाहून गेलेली जनावरे असतील अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गोरगरीबचे शेतीचे व घराचे पंचनामे त्वरीत करून त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी असे प्रशासनला सांगितले.यावेळी श्री रावसाहेब तात्या पाटील, श्री शेखर पाटील, सरपंच प्रतिनिधी श्री रघुनाथ कोरके, श्री सुनिल तळेकर, श्री जयवंत गावधरे, श्री नामदेव कोरके, श्री युवराज कोरके, श्री तानाजी गावधरे, श्री भारततात्या जमदाडे, श्री . बाळासाहेब पवार, व जमदाडे वस्तीवरील सर्व नागरीक उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom