राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे हजारो कर्जधारकाना दिलासा
सक्तीने हप्ता वसुली न करण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे हजारो कर्जधारकाना दिलासा
प्रतिनिधी–सोलापूर—सोलापूर जिल्ह्यातील सक्तीने वसुली करणाऱ्या बचतगट,।मायक्रोफाईनान्स, बजाज फायनान्स इतर बँका यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी १२ अक्टोबरला बोंबाबोंब बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यांनतर संबंधित पोलीस प्रशासनाने किरण साठे यांची व निवासी उपजिल्हाधिकारी अजितकुमार देशमुख यांची भेट घालून दिली होती त्यावेळी आम्ही आपल्या मागणीनुसार परिपत्रक काढून यांच्यावर उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलणार असल्याचे आश्वासन दिले होते.साठे यांनी याच मागणीसाठी विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर २७ तारखेला बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा ही दिला होता.
त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यामध्ये लॉक डाउनच्या कालावधीत काही बँका,वित्तीय संस्था,बचतगट,हे कर्जधारक यांच्याकडून सक्तीने कर्ज वसुली करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत,भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे निर्देश असतानाही सक्तीची वसुली सुरू आहे,बँकांनी वित्तीय संस्थांनी बचतगटानी वसुलीसाठी तगादा लावणे,बाळाचा वापर करणे,धमकावणे,असे प्रकार करून कर्ज वसुली करू नये याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे की,लॉकडाउनच्या कालावधीत शेती,छोटे,मोठे उद्योग,व्यवसाय बंद होते,अद्यापही अनेक व्यवसाय बंद आहेत,या मंदीमुळे अनेकांचे रोजगार गेले,शेतकरी आर्थिक संकटात आहे,सर्वसामान्य कर्जधारक संकटात सापडला आहे,ही परिस्थिती लक्षता घेता रिझर्व्ह बँकेने कर्जाच्या हप्ता वासुलीला सूट दिली होती,मात्र काही बँका वित्तीय संस्था,बचतगट कर्जदारांना तगादा लावून वसुली करीत आहेत यावर निर्बंध आणण्यासाठी अग्रेनी बँकेने सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय, वाणिज्य,सहकारी बँका,वित्तीय संस्था यांच्या वरिष्ठांची बैठक घेऊन सूचना कराव्यात कर्जदारांना मानसिक शारीरिक,छळ करणाऱ्या घटना घडणार नाहीत यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हा प्रबंधक,जिल्हा अग्रणी बँक,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर,प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर यांना दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.
चौकट
सोलापूर जिल्ह्यातील मायक्रोफाईनान्स,बचतगट,बजाज फायनान्स व इतर बँका ह्या सक्तीने हप्ता वसुली करीत असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी १२ अक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा दिला होता,त्याची दखल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर उपजिल्हाधिकारी अजितकुमार देशमुख यांनी घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
किरण साठे
सरचिटणीस–सोलापूर जिल्ह
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
