कर्जावरील व्याज माफी व हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

कर्जावरील व्याज माफी व हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी

प्रतिनिधी—माळशिरस–सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यातील मायक्रोफाईनान्स व बचतगट कर्जधारक महिलांना व इतर कर्जधारक यांना हप्ता भरण्यासाठी मुदत वाढ व थकीत हप्त्यावरील व्याज माफी देण्यात यावी तसेच कर्जधारक यांना त्रास देणाऱ्या बचतगट,मायक्रोफाईनान्स, इतर बँका याच्या तक्रारी करण्यासाठी टोल फ़्री नंबर सार्वजनिक करण्याची मागणी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये लॉकडाउन झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील बचतगट व मायक्रोफाईनान्स,इतर बँका,व बजाज फायनान्स मधून कर्ज घेतलेल्या कर्जदारांना हप्ते भरणे शक्य नसल्याने त्यांना हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ व त्यांच्या थकीत हप्ताच्या रकमेवर आकारलेले व्याज माफ करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.

सोलापूर जिल्हा अधिकारी यांनी जिल्ह्यातील संबंधित बचतगट,मायक्रोफाईनान्स, बजाज फायनान्स व इतर बँकांची बैठक आयोजित करून यावर तोडगा काढावा तसेच सातारा जिल्हाधिकारी यांनी सक्तीने वसुली करणाऱ्या बचतगट,मायक्रोफाईनान्स, बजाज फायनान्स यांच्या विरोधात तक्रार नोंदवन्यासाठी एक टोल फ्रि क्रमांक सार्वजनिक केला आहे तसा आपण टोल फ्री क्रमांक सार्वजनिक करावा आणि सक्तीने वसुली करणाऱ्या बचतगट,मायक्रोफाईनान्स, बजाज फायनान्स व इतर बँका यांच्यावर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक १२ /१०/२०२० रोजी पासून तीव्र स्वरूपात बोंबाबोंब आंदोलन छेडले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला आहे.यावेळी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थचे जिल्हा उपाध्यक्ष सागर बडवे,चर्मकार महासंघाचे पंढरपूर शहराध्यक्ष व मनसेचे पंढरपूर विभाग प्रमुख अमोल घोडके,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख घनश्याम भवर उपस्थित होते.सदर निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,महसूलमंत्री महाराष्ट्र राज्ययांना पाठविण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom