शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांचे लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी मानले आभार
प्रतिनिधी—सोलापूर–महाराष्ट्रामधील मातंग समाजाचे आशास्थान व प्रेरणास्थान असलेले साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्री राहुल शेवाळे यांनी दिल्ली येथे चालू असलेल्या अधिवेशनात केली आहे,त्याबद्दल लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
पुढे बोलताना लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे म्हणाले की आण्णाभाऊ साठे यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजाला ओळख देण्याचे काम केले आहे, तसेच कामगारांच्या प्रश्नासाठी व दलित,शोषित,वंचित, समाजासाठी व साहित्यातून आपली सर्व वर्णने रंगवून त्याच्या व्यथा माडयाण्याचे काम केले,त्यांनी देश्याबाहेर म्हणजे रशियामध्ये जाऊन पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी, शेतकरी,शेतमजूर यांच्या तळ हातावर तरलेली आहे असा सिद्धांत मांडला आणि तो सर्व जगाला भावला आशा थोर साहित्य असलेल्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे अशी आमची भावना असल्याचे लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी व्यक्त केली व श्री खासदार राहुल शेवाळे यांचेही आभार मानले.