पुरंदावडे प्रा.आ.केंद्रातील कदम सिस्टर यांच्या चौकशीचे आदेश–शंकर वाघमारे
प्रतिनिधी—पुरंदावडे—प्रा.आ.केंद्र येथील सौ कदम सिस्टर यांच्यासह ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर वरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी माळशिरस तालुक्याचे आरोग्यधिकारी श्री डॉ रामचंद्र मोहिते यांच्या पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आर पी आय गवई गटाचे जिल्हाकार्यध्यक्ष शंकर वाघमारे यांनी ठिय्या आंदोलन केले,यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश धाइंजे युवक जिल्हा अध्यक्ष अमित सोरटे,युवक तालुका अध्यक्ष वैभव धाइंजे,संपर्क प्रमुख दत्ता सुंदर सावंत,महिला आघाडी तालुका अध्यक्ष रुक्मिणी रणदिवे,दादा सावंत,अजय धाइंजे,शेखर सावंत,राहुल भोसले शशिकांत सोनटक्के,पूजा शिंदे मनिषा सोनटक्के उपस्थित होते.
सदर निवेदनाची दखल घेऊन माळशिरस तालुका आरोग्यधिकारी श्री डॉ मोहिते यांनी प्रा.आ.केंद्र पुरंदावडे येथील वैद्यकीय अधिकारी यांना लेखी आदेश काढून चौकशी करण्याचे कळविले आहे,सदर चौकशीचा अहवाल हा ७/१०/२०२० रोजीपर्यंत तालुका आरोग्यधिकारी यांच्या कार्यलयात सादर करण्याची सूचना केली असल्याने माझ्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे बापू वाघमारे यांनी सांगितले.
