जयंत पाटील यांनी किरण साठे यांच्या मागणीची घेतली दखल
प्रतिनिधी–सोलापूर–महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे जन्माला आलेले व सातासमुद्रापार आपल्या राज्यासह देशाचे नाव उज्वल करून वास्तवरूपी साहित्याचे लिखाण करून आपला व देशाचा अभिमान वाढविणारे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवून शिफारस करावी अशी इमेलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी मागणी केली होती.
आण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला असल्याने व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील हे सुद्धा खुद्द सांगली जिल्ह्यातील रहिवाशी असल्याने त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे मागणी केली असल्याने माझ्या मागणीची दखल जलसंपदा मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतली आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी सांगितले,येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे असा प्रस्ताव पाठवून केंद्र सरकारकडे निश्चित शिफारस करेल व आण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांना जन्मशताब्दी निमित्त मोठी भेट देईल असा मला विश्वास असल्याचेही राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी म्हटले आहे.