डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी—किरण साठे
प्रतिनिधी—सोलापूर—नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा गावात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या व्यक्तीवर तातडीने मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
फुले,शाहू,आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याची देशामध्ये ओळख असताना ज्यांच्या नावाने या महाराष्ट्र राज्याला व देशाला ओळखले जाते आशा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची विटंबना होणे ही पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना असून राष्ट्रवादी काँग्रेसचे व बहुजन ब्रिगेडच्या वतीने या घटनेचा निषेध करीत असून या संबंधित आरोपीला अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.यावेळी बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,युवा ब्रिगेडचे शहराध्यक्ष उदय कांबळे,रफिक मुलाणी उपस्थित होते.