सांगवी येथे बहुजन ब्रिगेडच्या वतीने आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी
प्रतिनिधी—पंढरपूर
बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या आदेशानुसार व बहुजन ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा संघटक नानासाहेब खंडाळे व बहुजन युवा ब्रिगेडचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राजेश खरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न,सत्यशोधक, साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त व जन्मशताब्दी निमित्ताने सांगवी तालुका पंढरपूर येथे बहुजन ब्रिगेडच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन बहुजन ब्रिगेडचे कार्यकर्ते समाधान कांबळे यांनी केले होते.
या कार्यक्रमाला बहुजन ब्रिगेडचे पंढरपूर तालुका कार्यध्यक्ष गणेश नवगिरे,माजी उपसरपंच नारायण जाधव,उपसरपंच पप्पू अडसूळ,पोलीस पाटील सुनिल शिंदे,ग्रामपंचायत सदस्य प्रताप भोसले,प्रकाश बेंगाने,अमर रोडगे,धनाजी साठे,मल्हारी साठे,विलास कांबळे,पांडुरंग गायकवाड, इत्यादि उपस्थित होते.
