युवासेनेचे स्वप्नील भैय्या वाघमारे यांचे राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना कोव्हीड-19 च्या अडचणीसंदर्भात निवेदन.

युवासेनेचे स्वप्नील भैय्या वाघमारे यांचे राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना कोव्हीड-19 च्या अडचणीसंदर्भात निवेदन.

प्रतिनिधी सचिन रणदिवे
माळशिरस तालुकयाची लोकसंख्या सुमारे पाच लाख पेक्षा अधिक आहे.लोकसंख्येच्या मानाने येथे कोव्हीड केअर सेंटरसाठी 1136 बेडची आवश्यकता आहे.माळशिरस तालुक्यामध्ये सध्या आनंदनगरीत,महाळुंग,नातेपुते येथे 100 बेडचे तीन कोव्हीड केअर सेंटर येथे कार्यान्वित झाले आहेत.अशा परिस्थितीमध्ये यासाठी फक्त तीन डॉक्टर व प्रत्येकी एक नर्स स्टाफ यांची नियुक्ती केली आहे.ही यंत्रणा, व्यवस्था अतिशय अपुरी आहे. अन्यायकारक आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागांची यंत्रणा अपुऱ्या मनुष्यबळाच्या साधनांसह कोरोना परिस्थितीशी झुंज देत आहे तरी 1136 बेड आवश्यक असणारे सर्व मनुष्यबळ म्हणजे 12 एम.बी.बी.एस.डॉक्टर,69 आयुष डॉक्टर, 200नर्स स्टाफ,12 औषध निर्मिती अधिकारी,12 लॅब टेक्निशियन,60 वाॅर्डबाॅय,60 स्वीपर, 12 सेक्युरीटी व इतर आरोग्यविषयी सामग्री असणे आवश्यक गरजेचे आहे. तालुक्यात वाढता कोव्हीडचा संसर्ग विचारात घेता सध्याची मनुष्यबळ व यंत्रणा ही अतिशय गंभीर बाब असून याकडे लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या संदर्भाने युवासेनेच्या वतीने सोलापूर जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांनी राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन देण्यात आले शंभूराजे देसाई यांनी निवेदनाची दखल घेत तात्काळ काॅन्ट्रॅक्ट बेसवरती डॉक्टर्स नेमण्याचे तसेच सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाअधिकारी मिलिंद शंभरकर यांना सुचना दिल्या आहेत.यावेळी माळशिरस तालुक्यातील विविध विषयांचे निवेदन देण्यात आले.यावेळी उपस्थित युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांचेसह आमदार शहाजीबापु पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, सूर्यकांतनाना घाडगे, रवि मुळे, ॠशांत कानतोडे,विशाल गायकवाड, किरण भांगे, सुधिर पवार, अतुल माने इ.उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom