कोथळे येथील पाझर तलाव क्रमांक 1 चा प्रश्न मार्गी लावणार:-उत्तमराव जानकर
प्रतिनिधी सचिन रणदिवे
कोथळे तालुका माळशिरस येथे राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी माने वस्ती नजीक असलेल्या पाझर तलाव क्रमांक 1 ला भेट दिली व त्या दरम्यान त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या कोथळे येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विनंती केली की या तलावामुळे तीन गावांना पाण्याचा फार मोठा फायदा होणार आहे त्यामुळे हा तलाव दुरुस्त करून मिळावा यासाठी जानकर साहेब यांच्याकडे विनंती केली त्याअनुषंगाने पालकमंत्री,जलसंपदा व जलसंधारण मंत्र्याकडे विषय घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे उत्तमराव जानकर यांनी आश्वासन दिले यावेळी पंचायत समिती सदस्य अजय सकट,राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष बाबा माने, महेश शेटे, आप्पा माने,माने चेअरमन, पांडुरंग माने,दडस, माऊली माने, आगम तसेच कोथळे येथील ग्रामस्थ व शेतकरी बांधव उपस्थित होते.
