आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडची मागणी

आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस व बहुजन ब्रिगेडची मागणी

प्रतिनिधी–सोलापूर—साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या मागणीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवून शिफारस करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रातील साहित्यिकामध्ये साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचे नाव अग्रगण्य आहे, आपल्या साहित्यातून दलित,श्रमिक,कष्टकरी,शेतकरी,उपेक्षित,आशा अनेक घटकांचे वास्तववादी लिखाण त्यांनी केले असल्याने त्यांचे साहित्य जगातील प्रमुख २७ भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे,त्यामुळे आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या देशाचे नाव सातासमुद्रापार पोहचविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे, त्याबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपल्या शाहिरीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जागा करून संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठीही त्यानी मोठे योगदान दिले आहे असे निवेदनात म्हटले आहे.

सन २०२० हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या भारत देशाच्या सुपुत्रास भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या करीता आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीने केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी केली आहे.
सदर निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री,सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ही पाठवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom