माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी चव्हाण यांची निवड
श्रीपुर /प्रतिनिधी
दसूर गावचे सुपुत्र विजय नामदेव चव्हाण यांची माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिपक दिलिप कांबळे यांनी नियुक्तीचे पञ देऊन निवड करण्यात आली आहे.सदरची निवड माहिती अधिकार व पञकारिता क्षेत्रात कार्यरत आसताना अडीअडचणी सोडवत माहिती अधिकार चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय महासचिव गोविंद भावे व सर्व विभाग आघाड्यांचे मार्गदर्शक मनोज कोळसेकर, महाराष्ट्र उपाध्यक्ष कमलेश शेवाळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दादा माने,प्रकाश भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समाजवादी विचारधारनेला अभिप्रेत व लोकांनी लोकासाठी चालविलेले राज्य ही समाजवादी संकल्पना यशस्वी होण्यासाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या ध्येय धोरणे भारताच्या शाश्वत विकासासाठी राबवुन अधोरेखित करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिलीप कांबळे यांनी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी विजय चव्हाण यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे. यावेळी विविध संस्था व सामाजिक, राजकीय संघटनांच्या वतीने त्यांचा सन्मान करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
⬜चौकट ⬜
वरिष्ठांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्या जबाबदारीस पात्र राहून पत्रकारांचे प्रश्न व आडी अडचणी सोडविण्यासाठी व
संघटना वाढीसाठी काम करणार आहे.
विजय चव्हाण
नुतून सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष
माहिती आधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य.
