बहुजन ब्रिगेडच्या माळशिरस तालुका सरचिटणीस पदी अभयराजे भोसले यांची निवड
प्रतिनिधी–निमगाव–बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माळशिरस तालुका सरचिटणीस पदी विजयवाडी ता माळशिरस येथील अभयराजे भोसले यांची निवड करण्यात आली,निवडीचे पत्र बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या हस्ते अकलूजमध्ये देण्यात आले.यावेळी बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,राहुल भोसले,दादा लोखंडे,धैर्यशील कांबळे इत्यादि उपस्थित होते.
बहुजन समाजामध्ये एकी प्रस्थापित करून समाजातील प्रत्येक घटकाला बहुजन ब्रिगेडच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करून
शोषित,पीडित,व शेतकरी,विद्यार्थी,सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा करून संघटनेचे ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्य करावे असे निवडीची पत्रामध्ये नमूद केले आहे.
