उत्तमराव जानकर यांना मिळणार मंत्रिमंडळात स्थान राष्ट्रवादी काँग्रेस सोपविणार राज्याची जबाबदारी

मुंबई
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, व कॉंग्रेसचे होण्याऱ्या महाशिवआघाडी सरकारमध्ये माळशिरस विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार उत्तमराव जानकर यांचा थोड्या मतांनी पराभूत झाला आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यात पक्ष मजबूत करण्यासाठी तसेच राज्यात पक्षाला वाढविण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी नाव सुचविले असल्याचे सूत्रांनी माहिती दिली
माळशिरस तालुक्यातील परिवर्तनवादी बहुजन नेते,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उत्तमराव जानकर यांनी माळशिरस विधानसभा राखीव जागेवरून दिलेली लढत ही अत्यंत चुरशीची व रोमहर्षक ठरली
या मतदारसंघात राज्याचे नेते असल्याचा दावा करणारे नेते या निवडणुकीत उघडे पाडण्याचे काम या निवडणुकीने केले उत्तमराव जानकर यांनी कोणत्याही ठोस आर्थिक संस्था वर पकड नसताना ,संस्थात्मक जाळे नसताना फक्त आपल्या संघटन कौशल्याच्या आधारे जनमताला धरून ठेवणारे नेते म्हणून उत्तमराव जानकर याचा परिचय महाराष्ट्राला झालेला आहे, धनगर समाज आरक्षण मुद्यावरून अखेरचा लढा उभारणारे हे नेतृत्व महाराष्ट्राला ज्ञात झाले ,परंतु भाजप सारख्या पक्षाने या नेतृत्वाची कदर केली नाही ,मोहिते पाटील नावाच्या काल्पनिक शक्तीला भुलून त्यांनी उत्तमराव जानकर यांची उमेदवारी कापली ती फक्त मोहिते पाटील यांना हे नेतृत्व नको होते म्हणून परिणामी दुखावलेल्या उत्तमराव जानकर यांनी भाजप पक्षाचा त्याग करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला ,दुर्दैवाने यात त्याचा निसटता पराभव झाला परंतु 1 लाखाच्या पुढे त्यांनी मते मिळवली ,अनेक साथीदारांनी सोडलेली साथ व मोहिते पाटील यांची शक्ती व जुने निष्ठावंत भाजप कार्यकर्ते ,मोहिते पाटील यांना मिळालेले मित्रपक्षाचे नेते सारे एकत्रित आल्याने हा पराभव पहावा लागला ,असे असले तरी हीच लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी लसाठी वेधक ठरली ,ज्यांना पक्षाने सातत्याने पदे दिली ,सन्मान दिला त्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठठी याने पक्षश्रेष्ठी शरदचंद्रजी पवार साहेब हे कमालीचे दुखावले होते ,माळशिरस तालुक्यात आपले भाषण देताना त्यांनी जाहीर इशारा दिला होता की कुस्ती तुम्ही अगोदर सुरू केलीत ,पण तुमची पाठ टेकवल्याशिवाय मी राहणार नाही ,आणि त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले बळ उत्तमराव जानकर याचे पाठीशी उभे करण्याचा निर्णय घेत महाशिवआघाडीतील संभाव्य सरकारमध्ये राज्याची जबाबदारी देण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे निश्चित केले असल्याचे सूत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे ,या मुळे समग्र महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ही फायदा होणार असून धनगर समाजाचे पाठबळ राष्ट्रवादीला मिळण्यास मदत होणार आहे ,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom