सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या विरोधात किरण साठे यांचे २७ जुलै पासून बेमुदत ठिय्या आंदोलन

सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्या विरोधात किरण साठे यांचे २७ जुलै पासून बेमुदत ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी–सोलापूर–सार्वजनिक बांधकाम विभाग
अकलूज या कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री ढेपे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी निवेदन देऊन नेवरे ते श्रीपूर रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारावर व त्याच्या एजन्सीवर कारवाई करावी व संबंधित शाखा अभियंता यांना निलंबित करावे अशी मागणी केली आहे.

माळशिरस तालुक्यातील श्रीपूर ते नेवरे दरम्यानचा दत्त मंदिर ते चौदा सेक्शन हा रस्ता नुकताच सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज च्या मार्फत करण्यात आला आहे,हा रस्ता काम केल्यापासून काही महिन्यातच उचकटुन भेगा पडायला सुरुवात झाली आहे.संबंधित रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे हे सिद्ध होताना दिसत आहे असे किरण साठे यांनी निवेदनात म्हटले आहे,संबंधित काम होत असताना त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता उपस्थित नव्हते का?असा प्रश्न उपस्थित होत आहे,या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार हे काम निविदेप्रमाणे करण्यात आले आहे,असे सांगत असल्याचे आम्हाला समजले आहे,मात्र हे काम निविदेप्रमाने झाले असेल तर रस्ता उचकटून त्याला भेगा पडायला नको आहेत म्हणजे या रस्त्याच्या कामामध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे,आणि संबंधित काम करीत असताना ठेकेदारानी या कामामध्ये वापरलेले मटेरियल गुणवत्तापूर्वक होते का नाही ?हा प्रश्न उपस्थित होतो आहे,त्यामुळे संबंधित रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या रस्त्याच्या कामाची चौकशी करून रस्त्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदाराला व त्याच्या एजन्सीला काळ्या यादीमध्ये टाकून सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्याकडे असलेले एकही काम त्यांना देण्यात येऊ नये,तसेच त्या ठेकेदारावर कारवाई करून या कामा संदर्भात जबाबदार असलेल्या शाखा अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम अकलूज यांच्या कार्यालयासमोर शासकीय वेळेमध्ये दिनांक २७ जुलै पासून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.सदर निवेदनाच्या प्रति माहितीसाठी व पुढील कार्यवाही साठी,मा श्री दत्ता मामा भरणे राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य,मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे,अधीक्षक अभियंता सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांना पाठविण्यात आल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom