डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान असलेल्या राजगृहावर तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई करा माहिती सेवाभावी संस्था
प्रतिनिधी सचिन रणदिवे
महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले राजगृहावर दिनांक 7 जुलै 2020 रोजी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा ची तोडफोड केली तसेच घराच्या काचावर ही दगडफेक झाली यात घरातील व कुंड्यांचे नुकसान झाले ही अतिशय निंदनीय बाब आहे सदर घटनेचा माहिती सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व हल्लेखोरांना लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी अध्यक्ष त्रिदल सैनिक सेवा संघ, संस्थापक अध्यक्ष माहिती सेवाभावी संस्था मेजर संदीप (भाऊ)लगड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा यांच्यावतीने करण्यात आली यावेळी पश्चिम महाराष्ट्र संघटक महेंद्र भाऊ साठे, विशाल आगवणे, रोहन चव्हाण, रोहन भगत, शुभम ढवळे, हसन शेख, युवराज शिंदे,आदेश सोनवणे, यांनी वेळापूर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले.
