माळशिरस शहरा मध्ये अखेर आज कोरोना चे आगमन
प्रतिनिधी सचिन रणदिवे
माळशिरस येथे आज सायंकाळी एका महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे माळशिरस तालुक्यात कोरोना या रोगाची लागून होऊ नये म्हणून आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलिस प्रशासन विभाग अतिशय चांगल्या उपाय योजना राबवत आहे परंतु आज अखेर माळशिरस शहरामध्ये कुरोना ने आपले आगमन केले आहे ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव रुग्ण सापडला आहे त्या ठिकाणचा परिसर सील करण्यात आला आहे माळशिरस मध्ये कोरोना ने शिरकाव केल्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे
