कोरोनाच्या अनुषंगाने माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे झालेल्या कारवाई
प्रतिनिधी सचिन रणदिवे
महाराष्ट्र शासनाने राज्यात कोरोना या विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांनी जा क्र 2020 /डीसीबी/ 2/ आर /आर 2019 दिनांक 28 /03 /2020 अन्वये संचार बंदीचा आदेश जारी केलेला होता तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती अधिनियम 2005 कलम 34, भारतीय साथीचे रोग नियंत्रण अधिनियम 1897 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम 1951 चे कलम 37 (3)अन्वये दिनांक 24/03/ 2020 ते 30 /06/ 2020 रोजीचे लॉक डाउन कालावधीमध्ये माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीत माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधक कारवाई करण्यात आली त्यामध्ये नैवद्य हातभट्टी दारू तयार करणारे दहा अड्डे उध्वस्त करून 11600 लिटर किंमत 4,64,200 रुपयेचे रसायन नष्ट करून अठरा आरोपींना अटक केली आहे सदर कालावधीत दारूबंदीचे 36 गुन्हे दाखल करून त्यामध्ये 45 आरोपी अटक करण्यात आले व त्यांच्याकडून
5,79,714/- रुपयाचा माल हस्तगत करून हातभट्टी गुन्ह्यातील माल जागेवर नष्ट करण्यात आला आहे त्याच प्रमाणे लाॅकडाऊन कालावधीमध्ये माळरानावर शेतामध्ये बसून जुगार खेळणारे लोकांवर 3 जुगार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामध्ये 22 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 3,04,710/- रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये रोख रक्कम वाहने जप्त केले आहेत त्याचप्रमाणे लाॅकडाऊन काळात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करणारे 16 दुकानदार यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत जिल्हा प्रवेश बंद असताना चोरून पोलिस ठाणे हद्दीत आलेल्या वर 21 गुन्हे दाखल करून 70 आरोपी अटक केले आहे. त्याच प्रमाणे लॉक डाउन कालावधीमध्ये माळशिरस पोलीस ठाणे कडील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विनाकारण माळशिरस पोलिस ठाणे हद्दीत फिरणारे 823 मोटरसायकल स्वरांवर कारवाई करून 3,34,500 रुपये दंड वसूल केला आहे तसेच 431 वाहने जप्त करण्यात आले आहेत विनाकारण इतरत्र फिरणारे 389 व्यक्तींना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 68 प्रमाणे ताब्यात घेऊन 69 प्रमाणे लोक डाऊन नियमाचे पालन करण्याची समज देऊन सोडण्यात आले आहे. सध्या परिस्थिती माळशिरस तालुका व माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीत कोरोनाचा प्रभाव वाढल्याने दिनांक पाच सात 2020 रोजी माननीय जिल्हाधिकारी सो यांनी प्रतीबंधत्मक उपाययोजना म्हणून जा.क्र 2020/मशा/कार्या/4/नैआ/कोरोना/जिनीक/प्र.क्र/24/आर/आर/1086 अन्वये काढलेल्या आदेशान्वये माळशिरस पोलीस ठाणे कडून दि06/07/2020 रोजी पासून विना मास्क च्या 43 केसेस करून 4300/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणारे सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे, सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन करणारे 11 लोकांवर कारवाई करून 2500/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे त्याचप्रमाणे चारचाकी वाहनांमध्ये 3 पेक्षा जास्त लोक बसवल्यामुळे सहा वाहनांवर कारवाई करून 3000/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. माळशिरस पोलिस ठाणे हद्दीत नगरपंचायत माळशिरस, तहसील कार्यालय माळशिरस, पंचायत समिती माळशिरस, यांचे अधिकारी व कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यापुढे अधिक प्रभावीपणे प्रतिबंधक उपाय योजना राबवून अधिकाधिक केसेस करण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी यापुढे मा जिल्हाधिकारी साहेब यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान करण्यात येत आहे.
