
अकलुज बायपास (गिरझणी चौक) ते नवीन बाजार तळ कडे जाणारा रस्ता दुरुस्ती करणेचे प्रांताधिकारी यांना जनसेवा संघटनेचे निवेदन
अकलुज येथील बायपास गिरझणी चौक येथुन नवीन बाजार तळाकडे जाणारे रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडलेले त्यामुळे येथे वारंवार अपघात होत आहेत. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरूस्त करावा अन्यथा धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जनसेवा संघटनेचे वतीने देण्यात आले आहे.या निवेदनात असे म्हटले आहे की यापुर्वी अकलुज बायपास (गिरझणी चौक) ते नवीन बाजार तळ या रस्त्यासाठी वेळो वेळी तक्रार व निवेदन दिलेले आहे परंतु यावर कसलीही कार्यवाही झाली नाही या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.परंतु गेले अनेक दिवसांपासून या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असुनही आपले प्रशासन याची कसलीही गंभीरपणे दखल घेत नाही त्यामुळे या रस्त्यावर अपघात होवून अनेकांना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. परंतु गेली अनेक वर्षापासून जाणुन बुजुन हा रस्ता बनवला गेला नाही आता पाऊस पडलेमुळे तर मोठमोठे खड्डे होऊन मोठ्या प्रमाणात चिखल व पाणी साठले जात आहे प्रशासनाचे दुर्लक्षामुळे सदरचा रोड खूप मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेला आहे खड्डयात रस्ता आहे कि रस्त्यात खड्डा हेच समजेनासे झाले आहे
सबब आपणास विनंती आहे की आपण आठ दिवसाच्या आत सदरचा रोड तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा जनसेवा संघटना व स्थानिक नागरीक यांचे वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन जनसेवा संघटनेचे वतीने देणेत आले आहे तसेच या निवेदनाची प्रत तहसीलदार माळशिरस,गट विकास अधिकारी माळशिरस पंचायत समिती,सरपंच साहेब/ ग्रामसेवक अकलूज ग्रामपंचायत यांना दिले आहे यावेळी माळशिरस चे माजी सरपंच विकासदादा धाइजे,उज्वला अडाने,महेश शिंदे,विष्णू देवकर,गणेश भालशंकर,अनिकेत काळे,सोमू बोकारे उपस्थित होते.