आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांचा आर.पी.आय.गवई गटाच्या वतीने जाहीर निषेध–बापू वाघमारे
प्रतिनिधी–सोलापूर–
सदाशिवनगर येथील कारखान्यातील कामगारांना पगार न दिल्याने व ऊस उत्पादक शेतकरी यांच्या ऊसाची बिले न दिल्याने आर.पी.आय.गवई गटाचे सोलापूर जिल्हा कार्यध्यक्ष बापू वाघमारे यांनी कारखाण्याचे चेअरमन व भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा उपविभागीय अधिकारी अकलूज यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला आहे,यावेळी बहुजन ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी जाधव-पाटील उपस्थित होते.
सदाशिवनगर ता.माळशिरस येथील साखर कारखान्याने कारखान्यात ऊस घातलेल्या ऊस उत्पादक शेतकरी यांची ऊसाची बिले अद्याप पर्यंत दिलेली नाहीत, तसेच या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या ही पगारी दिलेल्या नाहीत असे निवेदनात नमूद केले आहे.
सद्या सदाशिवनगर कारखाण्याचे चेअरमन असलेले भाजपचे विधानपरिषदचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या कारखाण्याच्या निवडणुकीत शेतकरी व कामगार यांना निवडणूक जिंकल्यावर तुमची सर्व देणी देण्याचे आश्वासन दिले होते,मात्र कारखाण्याची निवडणूक होऊन दीड वर्ष लोटले तरीही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी संबंधित शेतकरी व कामगार यांची देणी दिली नाहीत त्यामुळे त्यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले आहे तरी आपण आपल्या स्तरावरून संबंधित कारखाण्याला सूचना कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे,तसेच सदाशिवनगर साखर कारखाण्याचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शेतकरी व कामगार यांची फसवणूक केल्याने त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असल्याचे आर.पी.आय गवई गटाचे सोलापूर जिल्हा कार्यध्यक्ष बापू वाघमारे यांनी म्हटले आहे.
