अकलूज ग्रामपंचायतच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ जुलै रोजी तीव्र ठिय्या आंदोलन

अकलूज ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मुंगूसकर यांना निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण साठे

अकलूज ग्रामपंचायतच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ जुलै रोजी तीव्र ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी–सोलापूर
अकलूजमधील गणेशनगर ते सदुभाऊ चौक या रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची चौकशी करून दोशी आढळणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी अकलूज ग्रामपंचायतला निवेदन देऊन आदोलनाचा इशारा दिला आहे.सदर निवेदन ग्रामसेवक मुंगूसकर यांनी स्वीकारले.

अकलूजमध्ये गणेश नगर ते सदुभाऊ चौक या रस्त्याचे केलेले खडीकरणाचे काम हे निकृष्ठ दर्जाचे करण्यात आले आहे, संबंधित कामामध्ये अनियमितता असल्याची शक्यता असून त्यामध्ये दर्जाहीन मटेरियल वापरले असल्याची दाट शक्यता आहे,या रस्त्याचे केलेले काम प्रत्येक्ष पाहणी केली असता अनेक ठिकाणी रस्ता खचल्याचे दिसून आले आहे,या रस्त्यावर अजून फायनल डांबरी करणासाठी सिलकोट होणे बाकी असतानाच हा रस्ता खचल्याने यावर डांबरीकरणं केल्यानंतर ते कसे टिकणार हा प्रश्न निर्माण झाला आहे,याचाच अर्थ असा की संबंधित काम हे निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे,असे निवेदनात म्हटले आहे.

सदर कामामध्ये वापरलेले मटेरियल हे शासकीय प्रयोगशाळा येथून तपासून आणले आहे की नाही हा ही प्रश्न उपस्थित होत आहे,त्यामुळे संबंधित कामाची चौकशी केल्याशिवाय आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या कामाची बिले अदा करू नयेत आणि या कामाची क्वालिटी कंट्रोल मार्फत त्वरित चौकशी करून कामामध्ये दोष आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई न केल्यास येत्या १३ जून रोजी सदुभाऊ चौक येथे सदाशिवराव माने पाटील यांच्या स्मरकासमोर शासनाच्या सोशल डिस्टिंग चे नियम पाळून तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom