इस्लामपूर ग्रामपंचायतच्या विरोधात RPl गवई गटाचे १ जुलै रोजी ठिय्या आंदोलन

इस्लामपूर ग्रामपंचायतच्या विरोधात RPl गवई गटाचे १ जुलै रोजी ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी–माळशिरस

इस्लामपूर ग्रामपंचायत च्या माध्यमातून सन २०१८-१९ ते २०१९ ते २०२० या सालामध्ये १५ टक्के निधी वापरून करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आर पी आय गवई गटाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शंकर वाघमारे यांनी गटविकास अधिकारी माळशिरस यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.यावेळी तालुकाध्यक्ष वैभव धाइंजे उपस्थित होते.

इस्लामपूर ग्रामपंचायतच्या माध्यमातून वरील सालामध्ये करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या कामाची माहिती माझ्याकडे उपलब्ध असल्याचे शंकर वाघमारे यांनी निवेदनात म्हटले आहे,प्रशासन माझ्या निवेदनाची आधारे कोणत्या कामाची चौकशी करतायत यांची खात्री करून घ्यायची आहे असेही निवेदनात वाघमारे यांनी नमूद केले आहे,माझ्या निवेदनाची दखल घेऊन ज्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी कशा पद्धतीने केली जातेय हेही मला पहायचे आहे,त्यामुळे माझ्या निवेदनाची त्वरित दखल घेऊन संपूर्ण कामाची चौकशी करून ज्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे निष्प्रभ झाल्यास संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कारवाई न केल्यास येत्या १ जुलै पासून माळशिरस पंचायत समितीच्या समोर शासकीय वेळेमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशार आर पी आय गवई गटाचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शंकर वाघमारे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom