गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुक्याच्या वतीने निषेध

उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज येथे निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी

गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुक्याच्या वतीने निषेध

प्रतिनिधी—अकलूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे,शरद प्रतिष्ठान सोलापूर जिल्हा उपध्यक्ष विक्रमसिंह लाटे,तालुका उपध्यक्ष राष्ट्रवादी युवक चे राहुल खटके, प्रदेश उपाध्यक्ष सोशल मिडीयाचे विकी वाघे,राष्ट्रवादी युवक चे जिल्हा सरचिटणीस अनिकेत मुंडफने,सुदाम आवारे,आनंद मिसाळ,बंडू कांबळे,इत्यादी उपस्थित होते.

दिनांक २४/६२०२० रोजी पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्राचे आधारवड शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे,अशी भडकावू वक्तव्य करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न भाजपचे आमदार करीत असून देशाचे जेष्ठ नेते यांचा अपमान करून गोपीचंद पडळकर यांनी अकलेचे तारे तोडले आहेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले असून गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom