गोपीचंद पडळकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे बाहुले–राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे आमदार हे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे बाहुले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शरद पवार यांनी महत्वाची भूमिका घेतली होती,आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आगळा वेगळा प्रयोग करून महाविकास आघाडीची निर्मिती करून सत्ता स्थापन केली असल्याने देवेंद्र फडणवीस यांना खूप मोठ्या प्रमाणात वाईट वाटले असून स्वतः ची मुख्यमंत्री असलेली खुर्ची गेल्याने त्यांना स्वस्त बसू वाटत नाही,शरद पावर ह्यांनी देवेंद्र फडणवीस यांची एकहाती असलेली सत्ता घालवल्यामुळे ते सद्या बेचेन झाले आहेत आणि आता त्याच्या वागण्यातूनच ते दिसून येत आहे.
शरद पवार यांनी आपल्या वयाची ६० वर्ष या महाराष्ट्र राज्यासाठी खर्ची केलेली असताना भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करणे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची वावाह मिळविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केली आहे.
शरद पवार यांना कोरोनाची उपमा देणाऱ्या व देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे बाहुले असलेल्या गोपीचंद पडळकर यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होते की,शरद पवार हे ८०वर्षाचे आहेत,महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाने हैदोस घातलेला असताना आपल्या पक्षाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अगोदर शरद पवार हे मुंबईत कोरोना च्या रुग्णासाठी उभारण्यात येणाऱ्या हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले होते आणि विरोधी पक्षनेते घरामध्ये बसून सरकारला सूचना देण्यात मग्न होते,त्यामुळे या विधानपरिषदेची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते असलेले शरद पवार यांच्याबद्दल बोलणे हे आपणाला शोभत नाही आणि सत्ता गेल्याचे दुःख फडणवीस यांना जरूर झाले असावे मात्र कुणाच्या तरी म्हणजे आपल्या हातचे बाहुले असलेल्या गोपीचंद पडळकर यांच्यामार्फत शरद पवार यांच्यावर टीका करणे हे नैतिकतेला न शोभणारी गोष्ट आहे.
विधानपरिषदचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या कामाचा ठसा विधानपरिषद मध्ये उमटवून नाव कमवावे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या हातचे बाहुले बनून फिरो नये,शरद पवार यांच्याविषयी बोलताना जरा सांभाळून बोलावे असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी म्हटले आहे.
