नगरपंचायत माळशिरस वार्ड क्रमांक 1 मध्ये सुरू असलेले माऊली चौक ते कचरेवाडी बॉण्ड्री रोड रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम थांबवा
प्रतिनिधी सचिन रणदिवे
माळशिरस नगरपंचायत हद्दीत वार्ड क्र .१ मध्ये “माऊली चौक ते कचरेवाडी बॉऊंड्री रोड” रस्त्याला 74,94,283/- निधी मंजूर झाला आहे हा रस्ता पूर्वीचा माळशिरस ते कचरेवाडी डांबरी रस्ता आहे तरीही डांबरी रस्त्याचे डीमोशन होऊन खडीकरण रास्ता मंजूर करण्यात आला आहे.आणि खडीकरण मंजूर रस्ता देखील नियमाप्रमाणे काम होत नाही.सदर रस्त्याचे काम नियमबाह्य पद्धातीने निकृष्ठ दर्जाचे काम सुरु आहे . सदर काम चालु आसलेला रस्ता हा माळशिरसकडुन कचरेवाडी , चाकोरेकडे जाणारा रस्ता आहे . सदर रस्त्याचे काम नगरपंचाय माळशिरस यांनी ठेका दिलेल्या ठेकेदारा करवी चालु आहे . हे चालु असणारे रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे सुरु असुन सदर रस्त्याचे काम जुना डांबरी रस्ता वरचेवर ऊकरुन तसेच रस्त्याचे साईड पट्टीची माती वापरुन रोलिंग करण्याचे काम चालु आहे.सदर काम करण्यासाठी जमिनीचा पृष्ठ भागा स्वछ केलेला नाही, खोदकाम केलेले नाही . सदर जमिन ही पोकळ व भुसभुशीत स्वरुपाची आहे.नियमाप्रमाने जमिन खोदुन प्लॅन इस्टीमेटनुसार नियमाप्रमाणे पुनर्भरण करून रोलिंग करुन मजबुत करणे गरजेचे होते . सदर रस्ता वाहतुकीचा असल्याने या रस्त्यावरुन अवजड वाहने , ऊस वाहतुकीची वाहने देखिल मोठे प्रमाणात वाहतुक करत असतात . त्यामुळे या रस्त्याचे काम चालु असलेल्या नियमबाह्य व निकृष्ठ पद्धातीने पुर्ण झालेस . सदर रस्ता खचण्याची शक्यता नाकरता येत नाही . त्यामुळे भविष्यात अपघात होऊन जिवीत हानी होण्याची देखिल शक्यता नाकारता येत नाही , तसेच या रस्त्यामधुन बऱ्याच शेतकऱ्यांचे पाटबंधारे विभागाचे निरा – उजवा कालव्याचे फाटा नं .५८ मधुन येणारे पाण्याचे पाठ देखिल पुर्वी पासुन गेलेले आहेत . ते पाण्याचे पाठ जाणारे सिमेंट पाईप देखिल संबधित ठेकेदाराने उखडून व बुजवुन टाकलेले आहेत . तसेच सदर काम चालु असलेल्या रस्त्यावर एक ओढा देखिल आहे.त्या ओढ्यावर असणारा जुना पुल मोडकळीस आलेला आहे . त्या पुलाखालुन पाणी जाणाऱ्या चारी देखिल दगड टाकुन बुजवुन टाकलेल्या आहेत . त्यामुळे भविष्यात ओढ्याला पावसाचे येणारे पाणी कुठुन जाणार हा ही प्रश्न निर्माण झालेला आहे . वास्तवीक पाहता हे सर्व शेतकऱ्यांचे पाण्याचे पाट , ओढ्याच्या पाणी जाणाऱ्या पुलाखालील चारीवर पाईप टाकुन चारी शाबुत ठेवुन रस्त्याचे काम करणे गरजेचे होते व आहे.त्यामुळे सदर काम नियमबाह्य व निकृष्ठ पद्धातीने चालु राहिल्यास व निकृष्ठ दार्जाचे पुर्ण झाल्यास रस्ता लवकर खराब होवुन प्रशासनाच्या निधिचा व पर्यायाने जनतेच्या पैशाचा अपव्यय नुकसान होणार आहे .तसेच हा निकृष्ठ काम झालेला रस्ता लवकर खराब जाल्यास येणे – जाणे करता वापरताना जनतेला खुप त्रास सहन करावा लागणार आहे . सदरचा जुना रस्ता हा डांबरी रस्ता होता . त्यामुळे नवीन काम चालू असणारा रस्ता देखील डांबरी रस्ता होणे गरजेचे आहे . सदर रस्त्याचे काम हे डांबरी रस्त्याचे नसल्यास हे काम बदलून डांबरी रस्त्याचे होवून मिळणे देखील गरजेचे आहे .सदर नियमबाह्य व निकृष्ठ पद्धातीने सुरु असलेले रस्त्याचे काम
नगरपंचायत माळशिरस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे,त्यांच्या भोंगळ कारभारमुळे संबंधित ठेकेदाराने शासनाने ठरवून दिलेल्या निविदा व नियम धाब्यावर बसवून अत्यंत निकृष्ट प्रतीचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या रस्त्याची तात्काळ चौकशी होऊन सत्य काय ते पडताळणी करून निकृष्ट काम असल्यास त्या संबंधित ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी,रस्त्याचे नियमबाह्य व निकृष्ठ पद्धातीचे सुरु असलेले रस्त्याचे काम त्वरीत थांबवावे व सदर काम दर्जेदार नियमाप्रमाने केल्याशिवाय कोणताही धनादेश ठेकेदारास देण्यात येव नये .
या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थाचे वतीने मुख्याधिकारी नगरपंचायत माळशिरस यांना नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले त्यावेळी रशिद शेख,विकास धाइंजे,कैलास वामन सुरेश मंजुळे,शशिकांत साळुंखे,अनिल मदने,कमालशेख,अमीर शेख, सलमान शेख,विलास वामन,अफसर मुल्ला,उल्हास राऊत,मौला दरवेशी,संजय मंजुळे,विश्वतेज राऊत,बाबासाहेब दरवेशी ,संभाजी तरडे,सागर पवार,सचिन टेळे,विठ्ठल जमदाडे,अनिल लोखंडे,विलास साळुंखे,लखन पाटोळे इत्यादी ग्रामस्थानी निवेदनावर सह्या केल्या आहेत.सदर निवेदनाची त्वरित दखल न घेतल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.
