
शिवनेरी हाईट्स सोसायटीला आधार च्या वतीने सेनिटायजर फवारणी पंप भेट
संतोष भाऊ हरपळे यांच्या वाढदिवसा निमीत्त आधार बहुउद्येशीय संस्था संस्थापक अध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या वतीने सेनिटायजर फवारणी पंप भेट देण्यात आला.
कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावाने नागरिक हैराण झाले आहेत तसेच संपूर्ण पुणे परिसरात हाहाकार माजला आहे त्यामुळे आधार चे अध्यक्ष दत्ता कर्चे यांनी स्वयंभू फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ हारपळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसादिनी शिवनेरी हाईट्स सोसायटीच्या पदाधिकारी यांच्या कडे सेनिटायजर फवारणी पंप मा संतोष भाऊ हारपळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी शिवनेरी हाईट्स सोसायटीचे भाऊसाहेब मेमाने, अक्षय क्षीरसागर, उर्मिला आडेकर उपस्थित होते.