पंढरपूर शहरात सर्व उद्योगधंदे पुर्ववत चालू करा –सागर बडवे

पंढरपूर शहरात सर्व उद्योगधंदे पुर्ववत चालू करा –सागर बडवे

अनुसरून,देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये २२मार्च २०२०रोजीपासून देशाचे पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदयांनी लाकडाऊन घोषित केले आहे.तेव्हापासून अनेक कंपन्या व छोटे मोठे दुकानदार व व्यवसाय बंद आहेत.सध्या कोरोनाच्या महामाराने संपूर्ण देशात व महाराष्ट्रात थैमान घातले असून सर्वत्र उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. लोकांचा व्यवसाय ठप्प झालेला आहे.
नगरपरिषदेने पंढरपूर शहरात प्रत्येक दुकानावर ए,बी,सी,डी पॅटर्न चालू केला आहे. यामुळे व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण होत आहेत व शहरातील सर्व व्यावसायिक या पॅटर्नमुळे संभ्रमावस्थेत आहे.जर एक दिवसाआड दुकाने उघडल्यास गर्दीचे प्रमाण वाढु शकते व संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. तरी तो पॅटर्न पुर्णपणे रद्द करण्यात यावा व संपूर्ण शहर पुन्हा पुर्ववत चालू करण्यास परवानगी द्यावी.जरी दुकाने उघडली तरी त्यांना मास्क व सॅनिटायझर बंधनकारक करण्यात यावे.तसेच पंढरपूर शहराच्या चहुबाजुच्या सिमा रेषेत कडक नाकाबंदी करण्यात यावी जेणेकरून बाहेरील वाहन किंवा नागरिकास शहरात येण्यास व शहरातील नागरिकास शहराबाहेर जाण्यास मनाई करावी.
तरी या निवेदनाची त्वरीत दखल घेण्यात यावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा संघटक सागर बडवे शहर संघटक शैलेश धट शहराध्यक्ष प्रताप भोसले शहर उपाध्यक्ष अवधुत गडकरी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom