शरद पवार यांच्याशी वैर घेणारा अजून जन्माला यायचा आहे —किरण साठे

शरद पवार यांच्याशी वैर घेणारा अजून जन्माला यायचा आहे —किरण साठे

विधान परिषद च्या निवडणूकीमध्ये उमेदवारी वरून भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असताना भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शरद पवारच आठवतात याचाच अर्थ असा की चंद्रकांत पाटील यांच्या स्वप्नातही शरद पवार येतात हे सांगायला कोणत्याही जोतिषाची गरज नसल्याचे किरण साठे यांनी सांगून चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.

त्यांच्या पक्षामध्ये असलेला कलह त्यांच्या त्यांनी पाहायला पाहिजे,मात्र काही लोक राष्ट्रवादी काँग्रेस मधून फुटून भाजपमध्ये गेले आहेत,आणि त्यांना उमेदवारी दिली आहे,तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे,मात्र शरद पवार यांच्याशी वैर घेणाऱ्या व एक विधानसभा व एक लोकसभा निवडणूक ज्यांनी जिंकून दिली त्यांना उमेदवारी द्यायची नाही मग कुणाला द्यायची अशी चर्चा करणारे चंद्रकांत पाटील यांना मला सांगायचे आहे, की,शरद पवार यांचे राजकारण संपवण्याची भाषा आपण केली होती,आणि त्याचा रिझल्ट कोल्हापूर जिल्ह्यात दिसून आल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी लगावला आहे.

राहिला विषय माळशिरस तालुक्यातील ज्यांना आपण विधानपरिषद दिली त्यांना शरद पवार यांनीही विधानपरिषद व राज्यसभा दिली होती हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे,त्यामुळे शरद पवार यांच्याबरोबर वैर घेणारा अजून जन्माला यायचा आहे,अशी टीकाही किरण साठे यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांना वाईट तर वाटणारच कारण भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हा शरद पवार यांनी हिसकावून घेऊन महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता स्थापण्याचा आगळावेगळा प्रोयोग केला आणि तो यशस्वी ही करून दाखवला त्यामुळे शरद पवार यांचे राजकारण संपवणार म्हणणारे व शरद पवार हे विधानसभा निवडणुकी नंतर दिसणार नाहीत असे म्हणणाऱ्यांना शरद पवार यांनी चांगलाच धडा शिकवला.सत्तास्थापन करण्याच्या मुख्य भूमिकेत शरद पवार होते,त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या स्वप्नातही शरद पवार येतात असे बोलून चंद्रकांत पाटील यांचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom