जिल्हाधिकारी यांनी दिले टेंभुर्णी येथील मंडलाधिकारी यांच्या चौकशीचे आदेश किरण साठे यांच्या तक्रारारीची घेतली दखल

जिल्हाधिकारी यांनी दिले टेंभुर्णी येथील मंडलाधिकारी यांच्या चौकशीचे आदेश
किरण साठे यांच्या तक्रारारीची घेतली दखल

टेभुर्णी ता.माढा येथील तुळजाभवानी आश्रम शाळेतील गैरप्रकाराची चौकशी करून संबंधित मंडलाधिकारी सौ.मनिषा लकडे ह्या दोषी आढळल्यास त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अशी मागणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी दिनांक २०एप्रिल 2020 रोजी केली होती.

देशासह राज्यामध्ये लोक डाउन व संचारबंदी असल्याने सोलापूर जिल्ह्यात त्याचे काटेकोरपणे पालन होत असताना सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांनी दिनांक १३/४/२०२०रोजी आदेश काढून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास परवानगी नसल्याचे जाहीर केले होते,मात्र त्यांच्याच महसूल विभागाच्या टेंभुर्णी गावच्या मंडलाधिकारी सौ.मनिषा लकडे यांनी आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे दिनांक १४/४/२०२० रोजी टेंभुर्णी येथील तुळजाभवानी आश्रम शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून स्वतः त्या कार्यक्रमाला हजर राहून जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे,असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी निवेदनात म्हटले होते.

सदर तुळजाभवानी आश्रम शाळेत परप्रांतीय लोकांच्या राहण्याची सोय प्रशासनाने केलेली आहे,ह्याच लोकांबरोबर मंडलाधिकारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केला आहे,या कार्यक्रमात कुठेही सोशल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन झालेले दिसून येत नसल्याचे नमूद केले होते.
टेभुर्णी येथील तुळजाभवानी आश्रम शाळेतील दिनांक१४/४/२०२० व दिनांक १५/४/२०२० रोजीचे CCTV फुटेज तपासून दोशी आढळणाऱ्या व सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाला झुगारून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या मंडलाधिकारी सौ.मनीषा लकडे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे,व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ४३ अन्वये कारवाई करून यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली होती.

त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्हयाचे जिल्हाधिकारी शंभरकर साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या मागणीची दखल घेऊन २८ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डुवाडी यांना आदेश देऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून आपल्या स्वयंस्पष्ठ अभिप्रायसह अहवाल व त्याअनुषंगाने पुरावे जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

चौकट

संबंधित प्रकरणाचे सर्व पुरावे हे मी महसूलमंत्री व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे दिलेले आहेत,आणि सर्व पुरावे देऊनही यामध्ये टेंभुर्णी येथील मंडलाधिकारी यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकारी यांच्या विरोधात महसूलमंत्री,पालकमंत्री,विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार देऊन आंदोलन करणार आहे.

किरण साठे–सरचिटणीस–सोलापूर जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom