
बहुजन ब्रिगेडच्या तालुका उपाध्यक्षपदी कृष्णा कर्चे तर मांडवे विभाग अध्यक्षपदी बबलू कर्चे यांची निवड
बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष मा.किरण साठे व प्रदेश प्रमुख संघटक मा.दत्ता कर्चे यांच्या आदेशानुसार बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी कृष्णा कर्चे तर मांडवे विभाग अध्यक्ष पदी बबलू कर्चे यांची निवड करण्यात आली. सदर निवडीचे पत्र बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आनंद एकतपुरे व माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके यांनी दिले.यावेळी नातेपुते शहराध्यक्ष शक्ती कवितके,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,विकास बनसोडे इत्यादी उपस्थित होते.

संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे,शेतकरी, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा आणि बहुजन समाज एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे,आपल्या हातून संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जावा अशी अपेक्षा असल्याचे निवडीच्या पत्रामध्ये नमूद केले आहे.