पिंपरी येथील रेशनदुकानाचा परवाना रद्द करण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

पिंपरी येथील रेशनदुकानाचा परवाना रद्द करण्याची बहुजन ब्रिगेडची मागणी

प्रतिनिधी—माळशिरस–पिंपरी ता माळशिरस येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द करून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन ब्रिगेडचे प्रदेश प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी पुरवठा अधिकारी सोलापूर व माळशिरस तहसील कार्यालय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे,यावेळी बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,आर पी आय गवई गटाचे जिल्हा कार्यध्यक्ष बापू वाघमारे,बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके,विकास बनसोडे उपस्थित होते.

पिंपरी ता माळशिरस येथील रेशनदुकान चालक हे रेशनकार्ड धारक यांना शासनाच्या नियमानुसार माल वितरित करीत नसून त्यांच्या माल वाटपामध्ये शासनाचा नियमापेक्षा कमी प्रमाणात माल दिला जात आहे, दिनांक ९/५/२०२०रोजी पिंपरी येथील रेशन दुकान मध्ये ज्या कार्डधारकांना कमी प्रमाणात माल दिला होता त्यांनी आम्हाला बोलवून तेथे सामोरा समोर दुकानांमध्ये बसलेल्या व्यक्तीला विचारले असता त्यांनीही माल कमी दिल्याचे कबूल केल्याचे, व्हिडिओ मध्ये दिसत आहे व ते आपल्या whats aap नंबर वर पाठवले आहे,असे निवेदनात नमूद केले आहे.तसेच रेशनकार्ड धारकांना माल देतेवेळी मशीन असताना मालाची पावती देत नसल्याचेही निष्पन्न झाले आहे,त्याच बरोबर त्या रेशनदुकानाशी संबंधित कार्डधारकांनी आमच्याकडे लेखी तक्रार केली आहे,त्याचीही झेरॉक्स प्रत या निवेदनाच्या सोबत देत आहोत,तरी संबंधित रेशनदुकान चालकाने शासनाच्या नियमाचे उल्लंघन केले आहे, आणि रेशनकार्ड धारकांच्या मालावर दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले असल्याने त्याचा परवाना रद्द करून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व कार्डधारकांना फसविल्या प्रकरणी 420 चाही गुन्हा त्वरित दाखल करावा अन्यथा आपल्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा बहुजन ब्रिगेडच्या वतीने निवेदनात दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom