दिव्यांग व्यक्तीचा हक्काचा ५% निधी त्याच्या खात्यावर जमा करण्याचा प्रांत अधिकारी यांचा आदेश—लक्षवेधी सेनेच्या मागणीला यश

दिव्यांग व्यक्तीचा हक्काचा ५% निधी त्याच्या खात्यावर जमा करण्याचा प्रांत अधिकारी यांचा आदेश—लक्षवेधी सेनेच्या मागणीला यश

देशामध्ये कोविड19 या या विषाणूचा फैलावामुळे देशामध्ये लॉकडाउन असून दिव्यागावरती उपासमारीची वेळ आली असून शासनाच्या नियमानुसार सन 2018-19 सन 2019-20 या काळवाढीमधील दिव्यांगासाठीचा 5% निधी दिव्यांगाच्या खात्यावर जमा करण्यात यावा अशी मागणी लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्याकडे केली होती.यावेळी लक्षवेधी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमित भिंगारदिवे उपस्थित होते.त्या अनुषंगाने प्रांत अधिकारी शमा पवार यांनी गटविकास अधिकारी माळशिरस यांना पत्र काढून दिव्यांग यांचा हक्काचा ५%निधी बँक खातेवर जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

पंचायत समिती माळशिरस तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने तात्काळ दिव्यांगाच्या खात्यावर निधी जमा करावा तसेच शक्य असल्यास चालू वर्षामधील सन 2020-21या वर्षाचा सुद्धा 5% निधी दिव्यांग यांना देण्यात यावा असेही निवेदनात म्हटले होते.

माळशिरस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने तात्काळ दिव्यागांच्या खात्यावर निधी जमा न केल्यास त्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक संबंधित ग्रामपंचायत यांच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा इशारा लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे यांनी दिला होता त्याची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांना पत्र काढून दिव्यांग यांचा ५% निधी वाटप करण्याचा आदेश दिल्याने लक्षवेधी सेनेच्या मागणीला यश आल्याचे अनिल साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom