श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाहेरगावी जाणारे मजुर, भाजीविक्रेते व नागरिकांना फळं व बिस्कीट पुड्यांचे वाटप

श्रद्धेय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाहेरगावी जाणारे मजुर, भाजीविक्रेते व नागरिकांना फळं व बिस्कीट पुड्यांचे वाटप.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा १०मे रोजीचा वाढदिवस हा स्वाभिमानी दिन तसेच हा आठवडा स्वाभिमानी सप्ताह म्हणुन पाळला जातो. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतात. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गरीब जनतेला विविध माध्यमातुन सहकार्याची गरज आहे याच अनुषंगाने आज अकलूजमधील आंबेडकर चौक याठिकाणी सेवा कार्यासाठी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना, बाहेरच्या गावी पायपीट करत निघालेल्या मजुरांना व आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केळी व बिस्कीट पुडे वाटपाचा कार्यक्रम वंचितचे तालुकाध्यक्ष अभिजीत गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष धीरज मोरे, भारिप जिल्हा महासचिव विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
यावेळी आकाश जगताप, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सुनील ओव्हाळ, पत्रकार गौतम भंडारे, ऍड. सुमित सावंत, प्रदीप धाइंजे, सुनील कांबळे, विशाल सोनवणे, अकलूज शहराध्यक्ष सागर जगताप, विशाल खरात आदी उपस्थित होते.
वंचितच्या वतीने यावेळी नागरिकांना फिजीकल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन करत कोरोना आपत्तीच्या काळात सर्वतोपरी मदतकार्य करणार असल्याचे सांगितले. घरीच राहून एकमेकांना व प्रशासनाला सहकार्य करण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom