
गुरसाळे येथील कॅन्सरग्रस्त श्रावण रणदिवे यांना बहुजन ब्रिगेडकडून पाच हजार रुपये व धान्य वाटपाची मदत
गुरसाळे ता.माळशिरस येथील श्रवण दत्तात्रय रणदिवे या मुलाला ब्लड कॅन्सर झाला असून त्याच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून या मुलाचे वडील हे मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्याची घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असल्याने त्या मुलाच्या आजारावर उपचारासाठी लागणारा खर्च मोठया प्रमाणावर असून ही अडचण लक्षात घेऊन संबंधित रणदिवे या कुटुंबाला बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे व बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश दिला व एक महिना पुरेल एवढे धान्याचे किट देण्यात आले. यावेळी पत्रकार विलास भोसले,आनंद मिसाळ,विकास बनसोडे उपस्थित होते.
श्रावण रणदिवे यांचे वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असून त्यांच्या मुलाच्या दवाखाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येणार असून त्या मुलावरती उपचार करण्यासाठी दानशूर व्यक्तीनी या रणदिवे कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात येत असल्याचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी केले आहे.