महिला बचत गट व फायनान्स कंपनी यांची हप्ता वसुली त्वरित थांबवा–सागर बडवे

महिला बचत गट व फायनान्स कंपनी यांची वसुली त्वरित थांबवा–सागर बडवे

पंढरपूर तालुक्यातील बचतगट व फायनान्स कंपनी यांची हप्ता वसुली त्वरित थांबवावी अशी मागणी मनविसे जिल्हा संघटक सागर बडवे यांनी उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्रामध्ये२२/०३/२०२०रोजी पासुन महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी लाकडाऊन घोषित केला.
तर लाकडाऊन असल्यामुळे अनेक कंपन्या व छोटे-मोठे दुकानदार व्यवसाय बंद असल्यामुळे अनेक लोकांनी खाजगी फायनान्स कंपनी कडून कर्ज घेतले आहे.त्यांचे हप्त्ये भरायचे आहेत म्हणून अनेक जणांना फोन करून तुमचे हप्त्ये भरा नाहीतर दंड आकारण्यात येईल व अनेक जणांना दंड आकारण्यात आला व पंढरपूर तालुक्यामध्ये चैत्र वारी झाली नसल्यामुळे अनेकांचा व्यवसाय बंद झाला.महिलाचे बचत गट व त्याचे हप्त्ये जरी महाराष्ट्रात लाकडाऊन उठला तरी पुढे एक महिन्यांची वाढ देण्यात यावी. बजाज फायनान्स ने पंढरपूर तालुक्यात लाकडाऊन च्या काळात सुद्धा हप्त्ये वसुली चालु केली आहे. हे हप्त्ये वसुली त्वरित थांबवली जावी ही विनंती. असे निवेदन पंढरपूर प्रांताधिकारी सो यांना मनविसे कडुन देण्यात आले.
यावेळी उपस्थिती मनविसे सोलापूर जिल्हा संघटक सागर बडवे व पंढरपूर शहराध्यक्ष प्रताप भोसले आणि पंढरपूर शहर उपाध्यक्ष अवधुत गडकरी.व सर्व मनविसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom