आमदार राम सातपुते यांना क्वारंटाईन करण्याचा आदेश दिल्याने माझ्या मागणीला यश आले–किरण साठे

आमदार राम सातपुते यांना क्वारंटाईन करण्याचा आदेश दिल्याने माझ्या मागणीला यश आले–किरण साठे

प्रतिनिधी–लवंग–माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना तात्काळ कोरोन्टाईन करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदन देऊन जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी केली होती.

माळशिरस तालुक्याचे आमदार माळशिरस तालुक्यामध्ये आलेले आहेत,ते बीड येथून आलेत का?पुणे येथून आलेत हे सद्या गुलदस्त्यातच आहे,आमदार राम सातपुते हे त्यांच्या हक्काच्या व ते लोकप्रतिनिधी असलेल्या मतदारसंघात उशिरा का होईना आलेत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन ही किरण साठे यांनी केले होते.

माळशिरस तालुक्यात इतर तालुका व जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश आपल्या प्रशासनाने दिलेला असताना आमदार राम सातपुते यांना एक न्याय व सर्वसामान्य माणसाला एक न्याय हे कश्यासाठी चालले आहे असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदनात म्हटले होते.

आमदार राम सातपुते हे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत,त्याबद्दल आमचे कोणतेच दुमत नाही,मात्र त्यांनी इतर जिल्ह्यातून प्रवास केला आहे त्यामुळे त्यांनी स्वतः हुन क्वारंटाईन होणे गरजेचे आहे.असे साठे यांनी म्हटले होते.

तालुक्याचा कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी माळशिरस पंचायत समिती मध्ये सर्व कोरोनाच्या संदर्भात काम करणाऱ्या अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली आहे,मात्र आमदार स्वतःया तालुक्यातील जनतेला व अधिकारी यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत असा आरोप ही साठे यांनी केला आहे.त्यांनी माळशिरस तालुक्यातील जनतेची सेवा करण्यापासून आम्ही त्यांना रोखू शकत नाही,परंतु आगोदर आमदार राम सातपुते यांनी १४ दिवस होम क्वारंटाईन या होऊन क्वारंटाईन चा कालावधी पूर्ण झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी मैदानात उतरावे असा टोलाही किरण साठे यांनी लगावला आहे.

आमदार राम सातपुते हे बीड किंवा पुणे या दोन्ही पैकी एका जिल्ह्यातून प्रवास करून आल्याने त्यांनी कोरोन्टाईन होणे गरजेचे असताना आमदार राम सातपुते यांनी बैठक घेऊन अधिकारी यांच्याही अडचणीत भर टाकली असल्याचेही निवेदनात नमूद केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या मागणीची उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांनी दखल घेतली असून आमदार राम सातपुते हे माळशिरस येथे वास्तव्यास असून त्यांना होम क्वारंटाईन करण्याचा सूचना देण्याचा आदेश माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांना देऊन पुढील कार्यवाही करण्याची सूचनाही केली असल्याने माझ्या मागणीची दखल प्रशासनाने घेतल्याने माझया मागणीला यश आले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom