
अकलुज ग्रामपंचायत यांना घरपट्टी पाणीपट्टी माफ करण्यासाठी जनसेवा संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी:-सचिन रणदिवे
संपूर्ण जगभरात CORONO विषाणूच्या प्रभावामुळे भारतात लॉक डाऊन केले आहे. तसेच अकलूज मधील सर्व व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे जनतेला आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसला आहे. त्यामुळे सर्व कुटुंबे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहे. काही कुटुंबात एक दिवसाच्या जेवणाचीही आर्थिक मंदी दिसून येत आहे. त्यामुळे हे लक्षात घेऊन चालू वर्षाचे घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात यावी. सदर वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मा.डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज जनसेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे अकलुज ग्रामपंचायत पंचायत यांस आज दिनांक 2 मे 2020 निवेदन देण्यात आले. सदर निवेदन ग्रामपंचायतीचे वरिष्ठ अधिकारी बाळासाहेब वाईकर साहेब यांच्याकडे देण्यात आले तसेच यावेळी जनसेवेचे महेश शिंदे,निहाल शेख,गणेश भालशंकर,अलीम मदारी,व शरीवल होरा उपस्थित होते .