
नगरसेविका सौ.नूतन सोमनाथ वाघमोडे यांच्यावतीने माळशिरस येथील वार्ड क्रमांक 13 मध्ये Thermal screening शिबिर
प्रतिनिधी:-सचिन रणदिवे
आज दि.30.4.2020 रोजी माळशिरस येथील तलाठी कॉलनी,केंगार वस्ती येथे आरोग्य तपासणी शिबीर पार पडले.या शिबिराचे उदघाटन श्री.बबन केमकर(अप्पा)यांनी केले.या प्रसंगी माळशिरस नगरपंचायत चे मुख्याधिकारी वडजे साहेब, ॲड सोमनाथ आण्णा वाघमोडे, आरोग्य विभागातील डाॅ दत्तात्रय वाघमोडे, सौ. शोभा वाघमोडे तसेच नगरपंचायत मधील द्रुवकुमार सोनवणे,निलेश कस्तुरे व नाना गोरे उपस्थित होते.
सुरवातीला विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन केले व नंतर सर्व अधिकारी कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.या शिबिरात 259 जणांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर Thermal Screening करण्यात आले.आलेल्या प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या घरीच राहून कोरोनाशी देत असलेल्या लढ्या बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी गुलाबपुष्प देण्यात आले.शिबिरासाठी श्री.रवींद्र पवार(ग्रामसेवक)यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून दिली.या वेळी बाळासाहेब वाघमोडे,शिवाजी वाघमोडे,शिवाजी शिंदे,घुले सर,प्राचार्य ढाले सर,बाळासाहेब केंगार,जवंजाळ सर,Dr.बाळासाहेब चंदनशिवे,चांगदेव(मेजर) शिंदे,संभाजी काळे,नागनाथ खताळ,वझे काका उपस्थित होते.शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सचिन केंगार,भाऊसाहेब चंदनशिवे,,नवनाथ शिंदे,बाजी सोनवणे,निनाद ढाले,भोलानाथ रॉय,निळकंठ वाघमोडे,रितेश म्हेत्रे यांनी परिश्रम घेतले सदर शिबिराला १००% प्रतिसाद मिळाला
वॉर्ड क्र.१३ मध्ये म्हस्कोबा मंदिर(४०३),जाधव वस्ती(१७४),पिसेवस्ती(२२७) व तलाठी कॉलनी(२५९) या ४ ठिकाणी शिबिराचे आयोजन करून १००% लोकांचे Thermal Screening करण्यात आले आहे.त्यामुळे वॉर्ड क्र.१३ कोरोनामुक्त आहे. वार्ड क्र.१३ मध्ये गरजू लोकांना
अन्नधान्य वाटप,निर्जंतुकीकरण,
Thermal Screening आरोग्य तपासणी करण्यात आले असून आवश्यक ती सर्व उपयोजना करत असून पुढील काळासाठी आवश्यक ती खबरदारी नक्की घेण्यात येईल असे बोलताना सौ.नूतन सोमनाथ वाघमोडे(नगरसेविका,नगरपंचायत, माळशिरस) यांनी सांगितले.