माऊली पाटील मित्र परिवार अहिंसा सेवा समिती यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर

माऊली पाटील मित्र परिवार अहिंसा सेवा समिती यांच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर

नातेपुते प्रतिनिधी:-सचिन रणदिवे

माऊली पाटील मित्र परिवार व अहिंसा सेवा समिती यांच्यावतीने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आलेल्या लाॅकडाऊन काळात नातेपुते शहरात गरजू कुटुंबांना निरंतर घरपोच जेवण देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे या उपक्रमात सहभागी सर्वांच्या आरोग्याची काळजी म्हणून दिनांक 28/4/2020 रोजी आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबवण्यात आला पंचायत समिती सदस्य माऊली पाटील तसेच आहिंसा सेवा समितीचे प्रमुख अविनाश दोशी यांनी गरजू गरीब कुटुंबांना घरपोच जेवण देण्याचा उपक्रम लाॅकडाउन काळामध्ये गेली कित्येक दिवसापासून सुरू केला आहे त्यांच्या या कार्यात बरेच जण वेगवेगळ्या प्रकारच्या सहभाग नोंदवित आहेत यामधील सहभागी सर्वांच्या आरोग्याची काळजी म्हणून रक्त तपासणी तसेच आरोग्य तपासणी करण्यात आली या आरोग्य तपासणीसाठी पंचायत समिती माळशिरस चे कर्तव्यदक्ष तालुका आरोग्य अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते, नातेपुते मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ दत्तात्रय निटवे, उपाध्यक्ष डॉ प्रशांत गांधी, सचिव डॉ आप्पासाहेब वाघमोडे, तसेच रक्त तपासणी साठी अंकुश मोटे, गोरख नवगिरे, हनुमंत माने, सचिन बरडकर, दत्तात्रय कुदळे, विजय जाधव, विलास राजगे, संतोष मचाले, अमर भिसे यांनी सेवा दिली या घरपोच जेवण सेवेमध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी आरोग्य तपासणी करून घेतली यावेळी माऊली पाटील मित्र परिवार व अहिंसा सेवा समिती सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom