
अनिलराज पाटील सोशल फाउंडेशन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेडद पंचायत समिती गणांमध्ये सेनीटायझर फवारली केली
सोलापूरसह काही तालुक्यांमध्ये कोरोना चा वाढता संसर्ग असल्यामुळे दक्षता म्हणून मेडद पंचायत समिती गणातील तिरवंडी, मेडद, मारकडवाडी याठिकाणी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनिलराज पाटील सोशल फाउंडेशन व विठ्ठल रुक्मिणी परिवार यांच्यावतीने कोरोना महामारीचा खबरदारी उपाय म्हणून अत्यावश्यक सेवेतील स्वयंसेवकांनी गावातील परिसरात सेनी टायझर फवारणी व मास्क वाटप केले. मारकडवाडी याठिकाणी सेनी टायझर ची फवारणी करताना अनिलराज पाटील, सरपंच अमित वाघमोडे-पाटील, श्रीनाथ गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष दादा साहेब ढेरे, ॲड.अशोक वाघमोडे,दादा बर्गे, सौरभ बंडगर, बापू (शेठ) वाघमोडे सर्जेराव लोखंडे, शेखलाल शेख, विजय मासाळ सर, बाळू वाघमोडे, आण्णा मारकड आदी ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या या उपक्रमामुळे मारकडवाडी गावचे सरपंच अमित वाघमोडे पाटील यांच्यासह तालुका स्तरावरून अनिलराज पाटील यांचे कौतुक केले जात आहे.