
गरजू लोकांना मदत करण्याच्या हेतूने माळेवाडीच्या सरपंचाचा ढोंगीपणा—सागर कोळी
प्रतिनिधी–कोरोना या महामारीने जगामध्ये धुमाकूळ घातला असताना आपल्या देशामध्ये व महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वसामान्य जनता हतबल झली असल्याने माळेवाडी(अ) तालुका माळशिरस येथील विद्यमान सरपंच श्री जालिंदर फुले यांनी गोरगरीब,गरजू,निराधारांना मोफत जीवनावश्यक वस्तू वाटप करून मदत करण्यासाठी सुरुवात केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माळेवाडी अकलूज येथे गरजू,गोरगरीब लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी लोकांच्याकडून मदत गोळा केलेली आहे,आणि त्या मदतीच्या माध्यमातून ह्या जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या जात आहेत,मात्र ह्या वाटप केल्या जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तू ह्या ज्यांच्याकडे रहायला बंगले आहेत,ज्यांची परिस्थिती चांगल्या प्रकारची आहे,अशाच सर्व लोकांना सरपंच जालिंदर फुले यांच्याकडून जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या जात आहेत.
माळेवाडी(अ)ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य यांच्या घरीही जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आल्याचे कोळी महासंघाचे माळशिरस तालुका अध्यक्ष सागर कोळी यांनी सांगितले.
माळेवाडी(अ)ग्रामपंचायत च्या वतीने हे जीवनावश्यक वस्तू वाटप केले जात असल्याचे सांगितले जात आहे,मात्र या जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी काही दानशूर व्यक्तीनी ही आर्थिक मदत केली आहे,आणि सरपंच हे सर्वसामान्य जनतेला व गरजू लोकांना हे वस्तू वाटप करीत नसून आपल्या संबंधित असलेल्या व तोंड पहावून चांगली परिस्थिती असलेल्या लोकांना ते जीवनावश्यक वस्तू वाटप करीत असल्याने माळेवाडी(अ)चे सरपंच जालिंदर फुले व त्याांचे सहकारी हे जीवनावश्यक वस्तू वाटपाच्या नावावर ढोंगीपणा करीत असल्याचे कोळी महासंघाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांनी आरोप केला आहे.