
रेशन दुकानदार नियमापेक्षा कमी माल देत असल्यास माझ्याशी संपर्क साधावा–दत्ता कर्चे
देशासह राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉक डाउन व संचारबंदी लागू केली असल्याने सर्वसामान्य व गोरगरीब रेशनकार्ड धारकांना मोफत प्रति व्यक्ती पाच किलो तांदूळ हा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमाला माळशिरस तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार हे ठेंगा दाखवत असल्याचे निष्पन्न झाले आहे, आशा आपत्ती व्यवस्थापन परिस्थितीत सर्वसामान्य माणसाला अन्न वेळेवर मिळेनासे झाले असताना ह्या रेशन दुकानदारांनी अशी मुजोरी करणे चुकीचे आहे,असा प्रकार माळशिरस तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीबरोबर घडल्यास संपर्क साधावा असे बहुजन ब्रिगेडचे प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी सांगितले आहे.
माळशिरस तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार म्हणजे रेशन दुकानदार हा सर्रास रेशनकार्ड धारकांना शासनाने ठरवून दिलेल्या मालाच्या धोरणानुसार तांदुळ देत नाहीत हे अनेक ठिकाणी उघड झाले आहे,तरी माळशिरस तालुक्यातील जनतेने आपल्या रेशनकार्ड वरती आपल्याला किती माल मिळायला पाहिजे हे महाराष्ट्र शासनाने एका वेबसाईटवर त्याची माहिती दिली आहे,सदर माहितीच्या आधारे आपल्याला मोफ़त दिला जाणारा तांदूळ हा कमी प्रमाणात दिला जात असेल तर माझ्या 8551989999,9970566262 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन बहुजन ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रमुख संघटक दत्ता कर्चे यांनी केले आहे.असा प्रकार करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील रेशन दुकानदारांना योग्य तो धडा शिकवला जाईल अशा इशारा ही कर्चे यांनी दिला आहे