अकलूज येथे उद्या बहुजन ब्रिगेडची तातडीची बैठक
प्रतिनिधी—माळशिरस तालुका विधानसभा निवडणुकीत बहुजन ब्रिगेडचे अकलूज चे युवा शहराध्यक्ष उदय कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता,आणि तो अर्ज छाननीमध्ये मंजूर करण्यात आल्याने संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी उद्या सकाळी 11 वाजता बहुजन ब्रिगेडच्या माळशिरस तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांची बैठक अकलूजमध्ये संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असल्याचे बहुजन ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष विकास बनसोडे यांनी सांगितले.