
सर्वसामान्यांचे 3 महिने वीजबिल माफ करावे – अजय सकट
माळशिरस प्रतिनिधी
कोरोनाच्या पाश्वभूमीवर तालुक्यातील सर्वसामान्य ,गरीब ,शेतमजूर यांना हाताला काम नसल्याने दररोज आपलं पोट भरण्यासाठी कसरत करावी लागत आहे त्यामुळे राज्यसरकारने 3 महिन्याचे वीजबिल माफ करण्याची मागणी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, व ऊर्जामंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य, गरीब,शेतमजूर, गरीब शेतकरी, कामगार ,गरीब व्यापारी मध्यमवर्गीय लोकांना एक महिन्यापासून असलेल्या लॉकडोवनामुळे हलाखीचे जीवन जगावे लागत आहे एकतर काम नाही,आहे त्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये घराचा गाडा चालवावं लागत आहे त्यात सध्या उन्हाळ्याचे दिवस असलेने भरमसाठ वीजबिल येत आहे त्यामुळे दुष्काळात 13 महिना अशी अवस्था झाली आहे या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्यसरकारने 3 महिन्याचे वीजबिल माफ करावे अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी केली आहे