
वेळापुर पोलिस ठाण्याच्या वतीने 101 रक्तदात्यांनी केले रक्तदान
प्रतिनिधी -सचिन रणदिवे
वेळापूर पोलीस स्टेशनचे सपोनि दीपक जाधव व पोलीस कर्मचारी एकत्रीत येऊन या रक्तदान शिबिराचे आयोजन वेळापुर पोलीस ठाण्यात करण्यात आले या दरम्यान १०१ युवकांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन सपोनि दीपक जाधव यांच्या हस्ते करण्यात आले होते. आज सर्व जगामध्ये व भारत देशामध्ये कोरोनाच्या (राष्ट्रीय आपत्ती) विषाणूने थैमान घातले आहे.या विषाणूने असंख्य जणांचा बळी गेलेला आहे,तर लाखो लोकांना लागण झाली आहे. अशा रुग्णांना रक्ताची कमतरता पडू नये,म्हणून एक खारीचा वाटा म्हणून वेळापूर पोलीस स्टेशने रक्तदान शिबिराचे आयोजन करून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. या शिबिरासाठी मोठ्या प्रमाणात तरुणवर्गाकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी प्रत्येकाने सोशल डिस्टिंक्शन पाळून,मास्क लावून अंतर ठेवून रक्तदान केले.हे रक्तदान शिबीर शिस्तबद्ध पद्धतीने घेण्यात आले होते. केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हे रक्तदान शिबिर यशस्वी केले. यामध्ये पत्रकार मुसाभाई आतार विशेष म्हणजे देवाचे साहित्य विक्रेते व डीएमसीचे अध्यक्ष दत्तात्रय चंदनशिव यांचे सध्या लॉकडाऊन मुळे दुकान बंद असूनही रक्तदान केले. हे १०१ बॉटल रक्त संकलीत करण्यासाठी रेवनील ब्लड बॅंक सांगोला चे डाॅ. प्रमोद बोराडे,डाॅ. श्रीकांत पाटील,दत्ता चंदनशिव,पिनू येडगे,सुभाष माने,वैभव बनसोडे,संजय साठे, ग्रामपंचायत कर्मचारी,पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिरामुळे वेळापूर पोलीस ठाण्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.