
माळशिरस चे नगरसेवक मारुती(आप्पासाहेब) देशमुख यांनी जपली सामाजिक बांधिलकी
प्रतिनिधी–सचिन रणदिवे
माळशिरस नगरपंचायत चे नगरसेवक मारुती (आप्पासाहेब) देशमुख यांच्या वतीने सर्वसामान्य गोरगरीब लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आलेल्या संचार बंदीमुळे अनेक नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तरी ज्या नागरिकांचे हातावरचे पोट आहे अशा नागरिकांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत आहेत हीच गरज लक्षात घेऊन माळशिरस नगरपंचायत चे नगरसेवक श्री मारुती (आप्पासाहेब) देशमुख यांनी सामाजिक बांधिलकी जपली व माळशिरस मधील प्रभाग क्रमांक 11 मध्ये गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले त्यामध्ये तेल, साखर,डाळ, शेंगदाणे, चहापावडर या जीवनावश्यक वस्तूंचे लोहार गल्ली, माळी गल्ली,मुस्लिम गल्ली, गुरव गल्ली, या परिसरामध्ये या वाटप करण्यात आले आहे. यावेळी माळशिरस नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉ विश्वजीत वडजे, नगरसेवक मारुती देशमुख,नगरसेवक भगवान थोरात,नारायण थोरात,शरद गुरव, राजू तांबोळी, अजित धाईंजे उपस्थित होते.