
विठ्ठल रुक्मिणी परिवाराकडून कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री सहाय्यता निधी म्हणुन 1 लाखाची मदत
प्रतिनिधी—सचिन रणदिवे
सध्या सर्वांवरती कोरोना चे महाभयंकर संकट निर्माण झाले असून या संकटाशी सामना करण्यासाठी समाजातील बरेच मदतीचे हात पुढे येत आहेत त्यापैकी माळशिरस तालुक्यातील तिरवंडी गावच्या महात्मा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने व विठ्ठल-रुक्मिणी परिवाराच्या वतीने प्रधानमंत्री सहायता निधी चेक स्वरूपात 1 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री नागेश(मालक)वाघमोडे यांनी दिली महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा 15 वर्धापन दिन असून वर्धापन दिन साजरा करण्याऐवजी देशाला संकटाच्या वेळी मदत करण्याचा निर्णय संस्थेच्यावतीने घेतला असल्याची माहिती यावेळी संस्थेच्या सर्व संचालकांनी दिली या संस्थेच्या माध्यमातून आजवर समाजाची बरीच कमी केले आहेत त्यामुळे या संस्थेचा या भागामध्ये चांगलाच बोलबाला आहे व समाजहिताची संस्था म्हणून सध्या नावारूपाला आली आहे त्यांच्या या मदतीमुळे दानशूरते मुळे संस्थेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.